Breaking
Updated: नोव्हेंबर 29, 2025
डिघोळअंबा येथे देशी दारू पकडली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – जाधवजवळा (ता. केज) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्रीतून महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. फटाक्यांची आतिषबाजी करीत शिवप्रेमींना आनंदोत्सव साजरा केला.
केज तालुक्यातील जाधवजवळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २७ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी लोखंडी चौकोणी साचा तयार त्यावर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा १० ते १२ फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारला. गनिमीकाव्याने उभारलेला पुतळा पाहून शिवप्रेमी नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी अनिता जाधव या २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता गावात गेल्या असता त्यांना पुतळा बसविल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पुतळा कोणी बसविला याबाबत गावात विचारणा केली. मात्र त्यांना कोणी बसविला, याविषयी कोणी ही माहिती दिली नाही. शेवटी अज्ञात व्यक्तींनी ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची तोंडी, लेखी कल्पना न देता व शासनाची कोणतीही परवानगी न घेता, अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या छञपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविल्याची तक्रार केज ठाण्यात दिली. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार उमेश निकम हे करीत आहेत.