Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

गेवराईत रात्रीतून उभारला शिवरायांचा पुतळा

Updated: फेब्रुवारी 23, 2026

By Vivek Sindhu

गेवराईत रात्रीतून उभारला शिवरायांचा पुतळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई – शहरात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आल्याची घटना समोर आली असून शहरातील नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. रात्री उशिरा पुतळ्याची स्थापना पूर्ण करण्यात आली असून. सकाळी ही बाब समोर येताच नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली आणि महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नागरिकांनी सांगितले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हा शहराच्या इतिहास आणि संस्कृतीचे प्रतीक असून यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल. अनेकांनी फटाके फोडून करून आनंद व्यक्त केला. शहराच्या सौंदर्यात भर पडल्याचे मत व्यक्त केले.


Categories

Recent Posts