Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत शिवजयंती उत्साहात साजरी

Updated: फेब्रुवारी 19, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत शिवजयंती उत्साहात साजरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच शहरात ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम पथकांच्या तालावर वातावरण दणाणून गेले होते.
शहरातील प्रमुख चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि राजकीय पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. यावेळी शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, तसेच भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
शोभायात्रेत शिवकालीन वेशभूषा परिधान केलेल्या युवक-युवतींनी आकर्षक सादरीकरण केले होते. शहरातील विविध भागांत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुजन करण्यात आले. पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवून कार्यक्रम सुरळीत पार पाडला.
एकूणच अंबाजोगाई शहरात शिवजयंती उत्साह, भक्तीभाव आणि ऐतिहासिक अभिमानाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने अंबानगरी दुमदुमली.


Categories

Recent Posts