Breaking
Updated: May 28, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupयावर्षी वेळेत पेरणी होण्याची शक्यता मावळली, मशागतीची कामे लांबली
बीड – यंदा राज्यात मान्सुचे लवकर आगमण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार आठदिवसांपूर्वीच मान्सुनपूर्व पावसाने बीड जिल्ह्यासह पाटोदा तालक्यात हाहाकार केला आहे. या पावसाने उन्हाळी पिके व फळबागेचे अतोनात नुकसान केले आहे तर खरिप हंगाम पेरणीपूर्व शेतीची कामे थांबवली आहेत. यामुळे मृगनक्षत्रानंतर वेळेत होणारी पेरणी अतिपावसामुळेच लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले असून शेतामध्ये पाणी साचल्याने शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी थांबविली आहेत. पावसाने येत्या दोन दिवसात पाऊस उघडला तरी देखील शेतातील वापसा होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच मशागत आणि पेरणीच्या कामाला सुरुवात होईल. यामुळे यावर्षी पाऊस पडला नाही म्हणुन पेरणी लांबणार नाही तर अतिपावसामुळे वापसा न झाल्याने पेरणी लांबणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण जाणवू नये, यासाठी बियाणे व खतांचे योग्य नियोजन करण्यात आले असून तालुक्यातील गरजेनुसार सर्व साधने उपलब्ध करून देण्यात येतील, असे पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी उद्धव नेटके यांनी सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ मेपर्यंत संततधार राहणार आहे. त्यानंतर सात दिवसांचा पावसात खंड अपेक्षित आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यास वापसा होणे अशक्य ठरेल आणि पेरण्यांमध्ये आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. असा अंदाज व्यक्त होत आहे.
१२ हजार ६६३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता यंदा पाटोदा तालुक्यात सोयाबीनचा विक्रमी पेरा अपेक्षित असून अंदाजे १२,६६३ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. खरीप हंगामासाठी १४,४८८ मेट्रिक टन खतांची मागणी असून, त्यानुसार नियोजन केल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या संततधार पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले असून खरीप हंगामाच्या तयारीलाही मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंता वाढली आहे.