Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

विवाहितेचा विनयभंग; बीडमधील घटना

Updated: जानेवारी 29, 2026

By Vivek Sindhu

एटीएम कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: घरी पती नसल्याची संधी साधून घरात घुसून एका विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना खाजा नगर मोमीनपुरा भागात घडली आहे. याप्रकरणी पीडितेने स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी २३ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २८ जानेवारी रोजी सकाळी ती घरी एकटीच असताना आरोपी आझम महेमुद शेख (रा. बीड मामला मोमीनपुरा) हा तिच्या घरात घुसला. “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत त्याने पीडितेचा हात धरून लज्जास्पद वर्तन केले. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपी तिथून पळून गेला.

पेठ बीड पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार भोले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts