Breaking

शेतातील विद्युत प्रवाहाने घेतला वृद्धाचा बळी; पाटोदा पोलिसांत गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 1, 2026

By Vivek Sindhu

चौघांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा: पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे एका शेतकऱ्याच्या निष्काळजीपणामुळे ६० वर्षीय वृद्धाचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाला आहे. मच्छिंद्र बाबू उबाळे असे मयताचे नाव असून, ही घटना २९ डिसेंबर २०२५ रोजी घडली.

संतोष मच्छिंद्र उबाळे (रा. सौताडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी बाबासाहेब बयाजी सानप राहणार सौताडा याने आपल्या ऊसाच्या शेताचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारेला झटका मशीनचा विद्युत प्रवाह जोडला होता. नियमानुसार हा विद्युत प्रवाह दिवसा बंद ठेवणे आवश्यक असताना आरोपीने तो हयगयीने सुरूच ठेवला. या तारेचा स्पर्श झाल्याने मच्छिंद्र उबाळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार १०९८ पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts