Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

भरचौकातून तरुणाचे अपहरण करत तलवारीच्या धाकाने लुटले; अंबाजोगाईतील खळबळजनक घटना

Updated: फेब्रुवारी 17, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाईतील खळबळजनक घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: शहरातील एका चौकातून १९ वर्षीय तरुणाचे तलवारीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याला शेतात नेऊन मारहाण करत रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन सराईत गुंडांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण माळअप्पा थाटकर (वय १९, रा. धनगर गल्ली, अंबाजोगाई) हा तरुण शिक्षण घेत असून एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला आहे. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रवीण हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आपल्या मित्राच्या फुलांच्या दुकानासमोर बोलत उभा होता. यावेळी आर्यन उर्फ भैड्या मांदळेआणि सनी वाहुळे हे दोघे युनिकॉन मोटारसायकलवर तिथे आले. आरोपी आर्यन मांदळे याने प्रवीणच्या गळ्याला तलवार लावून त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले आणि अंबा सहकारी साखर कारखान्याजवळील एका शेतात नेले.

त्या ठिकाणी दोन्ही आरोपींनी प्रवीणला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या खिशात असलेले फायनान्सचे गोळा केलेले ७ हजार ३०० रुपये आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. प्रवीणने आरडाओरड केल्यानंतर लोक तिथे धावून आले, तेव्हा आरोपींनी ‘पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन तिथून पळ काढला. आरोपींच्या दहशतीमुळे प्रचंड घाबरलेल्या प्रवीणने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. अंबाजोगाई शहर पोलिसांनी याप्रकरणी आर्यन उर्फ भैड्या मांदळे आणि सनी वाहुळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंद या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts