Breaking
Updated: मार्च 18, 2026
असे म्हणत एकावर तिघांनी केला प्राणघातक हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगौतम बचुटे/केज :- माझ्याकडे काय बघतोस ? असे म्हणून एका मुस्लिम व्यक्तीवर तिघांनी लोखंडी रॉड, केबलने आणि लाकडांनी प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले आहे. मारहाणीचे चित्रण करीत असलेल्या पत्नीच्या हातातील मोबाईल घेऊन ते पळून गेले आहेत.
दि. १५ मार्च रोजी, सकाळी ११:०० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील कुंबेफळ येथील निसार शेख हे त्याच्या घरा समोर एका पाय पुसणी विक्रेत्याशी बोलत असताना रोहित दीपक थोरात हा त्याच्या मोटार सायकलवरून तेथून जात होता. तो निसार शेख यांना म्हणाला माझ्याकडे काय बघतोस ? मी तुला जिवंत सोडणार नाही. अशी त्याने धमकी दिली, म्हणून त्यांचे भांडण सोडविण्यासाठी निसार शेखची पत्नी आणि मुलगा समजावून सांगत असताना त्याने स्त्री वर्गास लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या नंतर त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत निघून गेला.
त्या नंतर पंधरा मिनिटांनी रोहित थोरात त्याचा भाऊ स्वप्नील थोरात आणि ज्ञानेश्वर थोरात हे पुन्हा भांडण करण्याच्या उद्देशाने तेथे आले. त्यावेळी रोहित याच्या हातात लोकांनी रोड, त्याचा भाऊ स्वप्नील थोरात याच्या हातात केबल वायर आणि ज्ञानेश्वर थोरात याच्या हातात लाकूड होते. त्यांनी घरात घुसून निसार शेख याला बेदम मारहाण केली नंतर त्याला घराबाहेर आणून लोखंडी रीड, केबल व लाकडाने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. रोहितने त्याच्या हातातील लोखंडी रॉड निसार याच्या डोक्यात आणि हातावर मारून मांडीत घुसविल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता तर याचवेळी स्वप्नील त्याला केबल वायरने आणि ज्ञानेश्वर लाकडाने मारहाण करीत होता. या भांडणाचे व्हिडिओ काढीत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी निसारच्या शेख याच्या पत्नीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पळून गेले.
नातेवाईकांच्या मदतीने निसार शेख यास उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोपचार करून अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान निसार शेख यांची पत्नी शाहीन शेख हिच्या तक्रारी वरून रोहित दीपक थोरात त्याचा भाऊ स्वप्नील दीपक थोरात आणि ज्ञानेश्वर अशोक थोरात या तिघांच्या विरुद्ध एका मुस्लिम व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६४/२०२६ भा
न्या. सं. १०९, ११८(१), ११८(२), ३९६, ३२९(३), ३३३, ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे हे तपास करीत आहेत.