बीड- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत कमी खर्चाचे कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह या घटकाचे प्रकल्प करिता शेतक-यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड राज्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असून शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सडून मोठया प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुध्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्यगुणवत्ता राखली जाऊन शेतकर्यांना अधिक नफा मिळत असल्याने कांदाचाळ उभारणीकडे शेतकर्यांचा कल वाढत आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह या घटकाचे मापदंड सुधारित करण्यात आलेले असून 5 ते25 मे.टन, 25-500 मे. टन व 500-1000 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी /लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी क्षमतेनुसार अनुदान अनुज्ञेय आहे.सदरील घटकाचा प्रकल्प खर्च रू.30,00,000/- पेक्षा जास्त झाल्यास बँककर्ज अनिवार्य असून (Credit Linked Back Ended Subsidy) अर्थसहाय्य हे बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात देय राहील.अनुदान मर्यादा खालीलप्रमाणे घटक खर्च मर्यादा अनुदान मर्यादा लाभार्थी पात्रता निकष
कमी खर्चाचे कांदाचाळ /लसूण साठवणूक गृह रु.7,000/- प्रति मे.टनसर्वसाधारण व अनुसूचित क्षेत्राकरिता 5 ते 1000 मे.टन क्षमतेसाठी (Pro-rata basis) ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के खालील तपशीलाप्रमाणे-
5-25 – रु.10,000/- प्रति मे.टन 25-500 रु.8,000/- प्रति मे.टन 500-1000 रु.6,000/- प्रति मे.टन स्वत:च्या मालकीची जमीन असणे आवश्यक 7/12 वर कांदापिकाची नोंद असणे आवश्यक कांदापिक असणे बंधनकारक आहे.
सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकयांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकयांचे उत्पादक संघ Farmers Producer Organizations FPOs), नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकरी यांच्या सहकारी संस्था,सहकारी पणन संघ यांना घेता येईल.
तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते कि, काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कांदाचाळ /लसूण साठवणूक गृह या घटकाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in
संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित नजीकच्या तालुका व उपविभागीय कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.