Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

रस्त्यावरची अडचण दूर करण्यासाठी जिल्हा वाहतुक शाखा व नगरपालिकेचे संयुक्त विशेष अभियान

Updated: नोव्हेंबर 21, 2025

By Vivek Sindhu

ऊस दरवाढीसाठी 24 नोव्हेंबरपासून बेमुदत चक्काजाम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अतिक्रमण धारकांवर कडक शिस्तभंग मोहीम, शंभराहून अधिक अतिक्रमण धारकांवर कारवाई
बीड – या अगोदर फेबु्रवारी व जून महिन्यात शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना तसेच हातगाड्यांवाल्यांना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यास काय होते याचा एकवेळ दणका दिल्यानंतरही शहरातील व्यापारी व स्टॉलचालक काही सुधारण्याचे नाव घेत नसून पुन्हा-पुन्हा मुख्यरस्त्यावर हातगाडे, ओटे, पत्र्याचे शेड दिसू लागल्याने आज दि.21 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपालिका आणि वाहतुक शाखेच्या माध्यमातून शहरातील अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करण्यात आली.
सार्वजनिक रस्ते हे सरकारची मालमत्ता आहे ही बाब माहिती असतांना व्यापार्‍यांकडून, स्टॉलचालक तसेच हातगाड्यावाल्यांकडून नियमांचे उल्लंघन करुन बीड शहरातील बस स्टॅण्ड, साठे चौक, सुभाष रोड, माळीवेस,  आदी मुख्य रोडवरील दुकानदारांनी व स्टॉल चालकांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, हातगाड्यावाले, टपर्‍यावाले सर्वांचे अतिक्रमण होवू लागले त्यामुळे नगरपालिका आणि जिल्हा वाहतुक शाखेने अतिक्रमण काढून रस्त्यांना मोकळा श्वास घेवू दिला. त्यामुळे बीड शहरातील रस्ते मोठे वाटू लागले आणि वाहने व नागरिकांना जाण्यासाठी रस्ता सुलभ झाला होता.  आज रोजी झालेल्या कारवाईत 100 पेक्षा अधिक अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी एपीआय सुभाष सानप , पीएसआय विजय जाधवर, पोलीस हवालदार आदिनाथ मुंडे, पोलीस अंमलदार संजय टुले, चिंतामण शिंदे, राहुल घाडगे, संतोष मोरे, पोलीस हवालदार चालक संतोष हारके, नारायण वाघमारे, शेख मॅडम तसेच नगर पालिकेचे अतिक्रमण प्रमुख मुन्ना गायकवाड सोबत सुजित जाधव, विकी दांगट, शरद खुपसे, राम रोकडे, किरण शिंदे, लखन साबळे आदींची उपस्थिती होती.
तसेच सपोनि सुभाष सानप यांनी कळविले आहे की, व्यापार्‍यांनी या पुढे रस्त्यावर अतिक्रमण करु नये व प्रशासनाला सहकार्य करुन कर्तव्याची जबाबदारी घ्यावी अन्यथा अतिक्रमणाची मोहीम थांबणार नाही असा इशारा दिला आहे.


Categories

Recent Posts