Breaking

सत्ताधाऱ्यांच्या कोरडा कळवळा ; तुटपुंजी मदत म्हणे सरकार संवेदनशील

Updated: सप्टेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

संभाजी नगर येथे मराठवाड्यातील बळीराजा करणार आक्रोश - किसान सभा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

संभाजी नगर येथे मराठवाड्यातील बळीराजा करणार आक्रोश – किसान सभा

बीड – सरकारची दुतोंडी भूमिका आणि नौटंकी पुन्हा जनतेसमोर आली असून जुलै-ऑगस्ट मध्ये झालेल्या नुकसानी मदत करत सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीची भरपाई दिल्याचे सांगत शेतकऱ्यांप्रति असलेली असंवेदनशीलता पुन्हा राज्यातील शेतकऱ्यांसह जनतेसमोर उघडी पडली आहे. सरकारच्या या भूमिकेचा किसान सभा जाहीर निषेध करत असून सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून सर्वोतोपरी मदत सरकारनी करावी याकरिता दि 30 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती किसान सभेने दिली आहे.

राज्यात अनेक भागात एप्रिल-मे मधील अवकाळी आणि जुलै-ऑगस्ट मध्ये झालेली अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जुलै-ऑगस्ट मध्ये झालेल्या नुकसानीची पंचनामे पूर्ण झाल्यावर सरकारने 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत जाहीर करण्यास सप्टेंबर महिन्याचा शेवट उजडला असताना याच कालावधीत राज्यात आणि जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन शेती, शेती पीक, शेती अवजारे, पशुधन यांची मोठी हानी झाली. पिढ्यानपिढ्या भरपाई होणार नाही असे शेतीचे नुकसान झाले असून सरकारने सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी न करता जुलै-ऑगस्ट मधील नुकसानीची केलेली 2 हजार 200 कोटी मदत देणारे आमचे सरकार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. जिल्ह्यात सप्टेंबर अखेर झालेल्या अतिवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे आलेला पूर यामुळे हजारो हेक्टरवरील पिकासह अक्षरशः शेती वाहून गेलेली असताना सत्ताधारी मंडळी फक्त पाहणी दौरा करत आहेत. जिल्ह्यात तसेच बाधित क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ सर्वोतोपरी मदत विनाविलंब शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणीकरिता मराठवाड्यातील शेतकरी, शेत मजूर, कामगार हजारोंच्या संख्येने संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयावर धडकून आपला आक्रोश सरकार समोर व्यक्त करणार आहे.

ओला दुष्काळ जाहीर करत 50 हजाराची मदत करा

खरिपाच्या सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या न भरून येणारे नुकसान झाले आहे. शेतीसह, पशुधन, शेती अवजारे सगळं नासधूस झाले आहे. मराठवाड्यात नांदेड आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची मदतीला सरकार पाहणी न करता मदत जाहीर केली असे राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत हे अत्यंत असंवेदनशील व बळीराजाच्या दुःखावर मीठ चोळण्यासारखे आहे.किसान सभा या तीव्र शब्दात निषेध करते.सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेत यापुर्वी असलेले पेरणी न होण्याची परीस्थिती, प्रतिकुल हवामान, स्थानिक अपदा, पिक कापणी पश्चात आपदा संरक्षण पुन्हा लागू करण्यात यावे. पीक विमा हे कॉर्पोरेट कंपन्याऐवजी शेतकऱ्यांच्या लाभाची बनेल यासाठी योजनेत बदल करावेत, अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुल, बंधारे, तलाव, विज वितरण कंपनीचे रोहीत्र, विजेचे खांब तात्काळ दुरुस्त करण्यात यावे, शाळा महाविद्यालयातील पदवी व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींची सर्व फी माफ करावी. शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजारची आर्थिक मदत जाहीर करत शेतकऱ्यांना धीर द्यावा अन्यथा किसान सभेकडून याबाबत तीव्र आंदोलन करण्यात येईल.

*कॉ.एड.अजय बुरांडे* किसान सभा, बीड


Categories

Recent Posts