केज – केज विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत नमिता मुंदडा या निवडून येऊन पुन्हा आमदार व्हाव्यात, म्हणून त्यांचे समर्थक सुनील घोळवे यांनी नवस केला होता. मुंदडा या निवडून येऊन आमदार झाल्या. नुकतेच घोळवे यांनी तिरुपती बालाजीला जाऊन कुटुंबियांसह दर्शन घेतले. त्यांनी स्वतःच्या डोक्याचे केश बालाजी चरणी अर्पण करीत नवस फेडला.
केज येथील सुनील घोळवे यांची कट्टर मुंदडा समर्थक म्हणून ओळख आहे. आ. नमिता मुंदडा यांना केज विधानसभा मतदार संघातून पुन्हा भाजपची उमेदवारी मिळल्यानंतर मुंदडा या निवडून येऊन पुन्हा आमदार व्हाव्यात. यासाठी सुनील घोळवे यांनी तिरुपती बालाजीकडे साकडे घालून नवस बोलले.
या निवडणुकीत आ. मुंदडा या २६०० मताच्या फरकाने विजयी झाल्या. निवडणुकीच्या निकालानंतर नवस फेडायला त्यांना घरगुती कारणावरून उशिर झाला. मात्र नवस फेडायचा ठरवून ४ जून रोजी घोळवे हे कुटुंबियासह तिरुपती बालाजीला गेले. घोळवे कुटुंबीय बालाजीच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी स्वतःच्या डोक्याचे केश अर्पण करीत नवस फेडला.
आमच्या नेत्या नमिता मुंदडा या आमदार व्हाव्यात, म्हणून केलेला नवस फेडल्याने माझे मन शांत आणि प्रसन्न झाले. देवाकडे केलेली प्रार्थना देव नक्की स्वीकारतो. नवस फेडल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते, आपल्या जीवनातील समस्या दूर होतात. सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते.