Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

नाशिक कुंभमेळ्यासाठी तपोवन येथील वृक्षतोड करू नका, टीईटी सक्ती, अन्यायकारक संच मान्यता धोरण, अशैक्षणीक कामांची सक्ती करण्यात येवू नये

Updated: डिसेंबर 6, 2025

By Vivek Sindhu

समाजवादी पार्टीच्या मुख्यमंत्र्यांकडे मागण्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

समाजवादी पार्टीच्या मुख्यमंत्र्यांकडे मागण्या

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यातील कुंभमेळ्यासाठी तपोवन येथील वृक्षतोड करू नका तसेच टीईटी सक्ती, अन्यायकारक संच मान्यता धोरण, अशैक्षणीक कामे सक्ती करण्यात येवू नयेत अशा मागण्या समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत गुरूवार, दि.०४ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या २ वेगवेगळ्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील कुंभमेळ्यासाठी साधु व संतांना थाबण्यासाठी तपोवन येथील वृक्षतोड करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे व सदर वृक्षतोड करण्यात येवू नये म्हणून सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी सुरू केलेले आंदोलन योग्य असुन सदर वृक्षतोड करण्यात येवू नये, सदर वृक्षतोड झाल्यास त्या भागात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होवून मानव जातीस ते अपायकारक असणार आहे. महाराष्ट्र सरकारचे पर्यावरण विभागाने याची दखल घेण्यात यावी. तसेच संपुर्ण महारष्ट्रातून या मागणीस पाठींबा मिळत आहे. तरी समाजवादी पार्टी सदर मागणीस जाहीर पाठींबा देत असून सदर वृक्षतोड करण्याचा निर्णय चुकीचा आहे. तो रद्द करण्यात यावा तसेच महाराष्ट्रामध्ये सरकारकडून शैक्षणिक धोरण राबवित असताना जे शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. ज्यांची नौकरीची फक्त चार-पाच वर्षेच राहीले आहेत. त्यांना टीईटी परीक्षेमधून वगळण्यात यावे व टीईटी सक्ती, अन्यायकारक संच मान्यता धोरण, अशैक्षणीक कामे, जुनी पेन्शन योजना, शिक्षकेत्तर कर्मचारी बंद असलेली पदे भरती, कमी पटाच्या शाळा बंद करण्यचे शासनाचे धोरण अन्यायकारक असून यामुळे जिल्हा परीषदेच्या अनेक शाळा बंद पडत आहेत. तरी शासनाने अशा जाचक अटी लादू नयेत अशा मागण्या समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत. तर समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव तथा चर्मकार सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड.शिवाजीराव कांबळे, ऍड.माऊली केंद्रे, शेख जिलानी महेबुब यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Categories

Recent Posts