Breaking

संकटात सोबतीला; कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी खा.बजरंग सोनवणेंचे प्रयत्न

Updated: जानेवारी 16, 2026

By Vivek Sindhu

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ३ लाखांची मदत मंजूर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ३ लाखांची मदत मंजूर

बीड: कुंभेफळ (ता.केज) येथील ऋषिकेश बाळासाहेब घाडगे यांच्या कर्करोग उपचारासाठी खा.बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून ३ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यामुळे ‘संकटात सोबतीला, दारात अवतरला, देवमाणूस अवतरला’, अशी भावना रूग्ण आणि नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
ऋषिकेश यांच्यावर औरंगाबाद येथील डॉ.रवींद्र कोडलीकेरी मेमोरियल हॉस्पिटल, येथे कर्करोगावरील उपचार सुरू आहेत. उपचारासाठी येणाऱ्या खर्चाचा काही भाग भागवण्यासाठी ही आर्थिक मदत देण्यात आली असून, रुग्णालयास थेट खर्चाच्या तपशीलासह आवश्यक कागदपत्रे पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या पत्रानुसार, मंजूर करण्यात आलेली रक्कम ही उपचारादरम्यान झालेल्या प्रत्यक्ष खर्चापुरतीच मर्यादित राहणार आहे. तसेच रुग्णालयाने उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून रुग्णाची माहिती व उपचाराचा तपशील वेळेत सादर करणे आवश्यक आहे. रुग्णाच्या अर्जाची नोंद २० डिसेंबर २०२५ रोजी पंतप्रधान कार्यालयात झाली होती. या आर्थिक मदतीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या ऋषिकेश आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात खा.बजरंग सोनवणे यांनी पाठपुरावा केल्याने मदत मंजूर झाली आहे. सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी हा मोठा आधार ठरत असून बीड जिल्ह्यातील रूग्णांसाठी खा.बजरंग सोनवणे कायम पाठपुरावा करताना दिसत आहेत. आजवर अनके रूग्णांना त्यांच्यामुळे मदत झालेली असून संकटकाळी हक्काचे खासदार म्हणून सोनवणे यांच्याकडे मदतीचा हात मागीतला जात आहे. जिल्ह्यातील रूग्णांना मदत मिळून देण्यासाठी खा.सोनवणे यांनी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. संबधित यंत्रणेच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.


Categories

Recent Posts