Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

चनई येथे रोटरीचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Updated: फेब्रुवारी 21, 2026

By Vivek Sindhu

२५० ग्रामस्थांवर औषधोपचार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

२५० ग्रामस्थांवर औषधोपचार

अंबाजोगाई- रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान, चनई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने चनई (ता. अंबाजोगाई) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गावातील २५० ग्रामस्थांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले.
या शिबिरामध्ये मधुमेह, हृदयरोग, वात-पित्त-कफ विकार, मुळव्याध तसेच दंत रोगांची तपासणी करण्यात आली. यासोबतच ब्लड शुगर टेस्टिंग, बी.पी. तपासणी, व गरजेनुसार ईसीजी तपासणी करण्यात आली. रुग्णांना आवश्यक ते मोफत औषधोपचार देऊन पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरासाठी , डॉ. नवनाथ घुगे, डॉ .अतुल शिंदे, डॉ. पल्लवी लोमटे, डॉ. सचिन पोतदार, डॉ. सुरेश आरसुडे व डॉ. इमरान अली यांनी रुग्णतपासणी केली.
सर्व डॉक्टरांनी निःस्वार्थ सेवाभावातून नागरिकांची तपासणी करून योग्य सल्ला दिला.
या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख बालासाहेब कदम, संयोजक रमेश देशमुख, संतोष मोहिते यांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारून नियोजन व अंमलबजावणी यशस्वीरीत्या पार पाडली.
या प्रसंगी डॉ. नवनाथ घुगे, डॉ. सचिन पोतदार, डॉ. अतुल शिंदे, डॉ. सुरेश आरसुडे, कल्याण काळे, धनराज सोलंकी, सचिव मंजुषा जोशी, संतोष मोहिते, प्रदीप झरकर, बालासाहेब कदम, प्रा .अजय पाठक, रुपेश रामावत, गोपाल पारिख, राजेंद्र घोडके, स्वप्निल परदेशी, अजित देशमुख, गणेश राऊत, बालाजी घाडगे उपस्थित होते.


Categories

Recent Posts