Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

रोटरी क्लबच्या वतीने मतदारांसाठी सेल्फी पॉईंट व वृक्षांचे वाटप

Updated: डिसेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

रोटरी क्लबच्या वतीने मतदारांसाठी सेल्फी पॉईंट व वृक्षांचे वाटप

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई -: नगर परिषदेच्या मतदानासाठी मतदारांमध्ये जनजागृती व मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी श्री.खोलेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षांचे वाटप व सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार जनजागृती ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी तर्फे,
या प्रेरणादायी उपक्रमाचे उद्घाटन, खोलेश्वर माध्यमिक शाळा, मतदान केंद्र परिसर, झाले या प्रसंगी उद्घाटक म्हणून सौ. जया अविनाश मुडेगावकर यांची उपस्थिती होती.यावेळी मतदारांनी मतदान केल्यानंतर मतदारांनी अभिमानाने शाईचा ठसा दाखवत, तुळशीचे रोप घरी घेऊन गेले आणि सेल्फीसह लोकशाहीचा उत्सव साजरा केला. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा.रोहिणी पाठक,सचिव मंजुषा जोशी, उपाध्यक्ष धनराज सोळंकी, कल्याण काळे, राजेंद्र घोडके, धनराज काळे,स्वरुपा कुलकर्णी यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.


Categories

Recent Posts