Breaking
Updated: नोव्हेंबर 13, 2025
रिंगण करून मारण्याची दिली धमकी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelरिंगण करून मारण्याची दिली धमकी
केज – केज पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर उभे असताना शिवसंग्राम पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना तुम्हाला बोलायचे आहे. असे सांगून बाजूला नेऊन बोटाला कडकडून चावा घेत बोटाचे कांडे तोडले. तर त्यांच्या मुलासह पुतण्याला ही मारहाण करीत त्यांना रिंगण करून मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
खरमटा येथील सुभाष जाधव हे स्व. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या गावातील प्रमोद बिभीषण पवार व सुजित बिभीषण पवार या दोघा भावांनी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वृद्ध आई प्रयागाबाई जाधव यांना “”तुझ्या मुलाला रिंगण करून मारणार आहोत. आता जिवंत सोडणार नाहीत,””” अशी धमकी देऊन गेल्याची माहिती त्यांना आईने फोन करून सांगितली. त्यानंतर त्यांनी आई व पुतण्या सौरभ विक्रम जाधव या दोघांना केजला येण्यास सांगितले. ते दोघे पोलीस ठाण्याकडे आले असता दुपारी ३.३० वाजता सुभाष जाधव हे ठाण्यासमोर रस्त्यावर उभे असताना प्रमोद पवार व सुजित पवार या दोघांनी येऊन त्यांना तुम्हाला बोलायचे आहे, थोडे बाजूला या, असे म्हणत त्यांना बाजूला नेले. याचवेळी प्रमोद याने सुभाष जाधव यांच्या डाव्या हाताची तर्जनी तोंडात धरून कडकडून चावा घेत एक कांडे फोडून काढले. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांची झटापट सुरू असताना त्यांचा पुतण्या सौरभ जाधव व मुलगा सुरज जाधव हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांना प्रमोद पवार व सुजित पवार या दोघांनी लाथाबुक्क्याने व चापटाबुक्याने मारहाण केली. त्यांनी पोहचलेले रिल स्टार असून तुमचे घर संपवुन टाकु. तुमच्यावर खोट्या विनयभंगाच्या केसेस करून जेलमध्ये टाकू अशा धमक्या दिल्या. अशी तक्रार सुभाष जाधव यांनी दिल्यावरून प्रमोद पवार व सुजित पवार या दोघा भावाविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार हनुमंत मुंडे हे तपास करीत आहेत.