Breaking
Updated: June 25, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज : प्रवाशी घेऊन जात असलेल्या एका पिकअपसमोर रेडा आडवा आल्याने पिकअप उलटला. या अपघातात मुलगा ठार झाला. तर त्याचे वडील जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. २४) केज तालुक्यातील कानडी माळी शिवारात घडली.
या बाबतची माहिती अशी की, लव्हुरी (ता. केज) येथील सचिन वसंत पवार आणि त्यांचा मुलगा सुजल सचिन पवार (वय १४) हे दोघे केज सय्यद खैरु सय्यद फतरु (रा. लव्हुरी) यांच्या पिकअपमध्ये (एम एच २५) ए जे २८६३) बसून लव्हुरीकडे येत होते. यावेळी कानडी माळी शिवारात अशोक भाऊराव सावंत यांच्या शेताजवळ पिकअपसमोर रेडा आडवा आल्याने पिकअप पलटी झाला. या अपघात सुजल पवार पिकअप खाली दबल्याने जागीच ठार झाला. तर त्याचे वडील सचिन पवार हे जखमी झाले.
या प्रकरणी मृताचे चुलते भगवान पवार यांच्या तक्रारी वरून पिकअप चालक सय्यद खैरु सय्यद फतरु याच्या विरुद्ध .गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.