Breaking
Updated: July 21, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupदोघांवर गुन्हा ; राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई
बीड (प्रतिनिधी) – बनावट देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक विश्वजीत अ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.०२ यांनी रविवारी रात्री १० वाजता धारूर घाटामध्ये सदर वाहनाचा थरारक पाठलाग करून दारूसह १४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.०२ चे दुय्यम निरीक्षक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे की, श्रीराम रंगाराव जाधव, वय ३६ वर्षे (रा.शिवाजीनगर माजलगाव, ता.माजलगाव, जि.बीड) आणि पवन सुरेश मुळे, वय २५ वर्षे (रा.श्रीरंगवाडी, ता.माजलगाव, जि.बीड) हे दोघेजण रविवारी बनावट देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाला मिळताच थरारक पाठलाग करून रात्री उशिरा १० वाजता धारूर घाटामध्ये सदर वाहनाला ओव्हरटेक करून थांबविले, आणि तपासणी केली असता त्या वाहनात ९० मिली क्षमतेच्या ५० बनावट देशी दारूच्या (देशी दारू संजिवनी बॉबी संत्राचे) बॉक्स आढळून आले.
Also Read: सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर माध्यमांनी अधिक भर द्यावा -जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
यामुळे तात्काळ कारवाई करीत महिंद्रा कंपनीचे चार चाकी वाहन (एक्सयुव्ही-५००) ज्याचा नोंदणी क्रमांक (एम एच – ४६, पी – ४३१८) व विविध कंपनीचे दोन भ्रमणध्वनी सह एकूण १४ लाख ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करून दारूबंदी कायद्यानुसार दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक विश्वजीत अ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.०२ चे दुय्यम निरीक्षक जगदीश व्ही.कोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर.बी.कदम व जवान सर्वश्री आर.ए.जारवाल, एस.व्ही.धस, एस.पी.कदम, एस.एस.चाटे, बी.एस.वायबट यांनी पार पाडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जगदीश व्ही.कोरे करीत आहेत.
आवाहन – अवैध व बनावट मद्य विक्रीची माहिती द्या :
नागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैद्य व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्या बाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क, बीड या विभागास माहिती द्यावी. माहिती पुरविणाऱ्याचे नांव गुप्त ठेवण्यात येईल. व अवैध मद्य विक्रीवर ठोस कारवाई करण्यात येईल.
~ विश्वजीत अ.देशमुख
(अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड, जि.बीड.)