Breaking

भाटसांगवीत जेवणाच्या कार्यक्रमात राडा; जातीवाचक शिवीगाळ करत कुकरी अन् काठ्यांनी प्राणघातक हल्ला

Updated: मार्च 26, 2026

By Vivek Sindhu

जातीवाचक शिवीगाळ करत कुकरी अन् काठ्यांनी प्राणघातक हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाटसांगवी येथे एका जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान जुन्या वादातून भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगपूर येथील रहिवासी गोवर्धन हरिभाऊ पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत कुकरी आणि काठ्यांनी गंभीर जखमी केले आहे. या घटनेत फिर्यादीसह इतर ७ ते ८ जण जखमी झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोवर्धन पवार हे आपल्या मित्रांसह भाटसांगवी येथे कमलेश बोरवडे यांच्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवण करून बाहेर येत असताना त्यांना शामराव पडुळे यांची स्कॉर्पिओ गाडी बलभीम बोरवडे आणि विजय बोरवडे हे दगड आणि काठ्यांनी फोडताना दिसले. फिर्यादीने त्यांना विचारणा केली असता, आरोपींनी ‘तुझा यात संबंध नाही’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बलभीम बोरवडे, विजय बोरवडे, किरण सोनवणे, मेघनाथ बोरवडे, महादेव बोरवडे, अजय शेंडगे, करण शेंडगे आणि इतर ४ ते ५ जणांनी हत्यारांसह हल्ला चढवला.

या हल्ल्यात बलभीम बोरवडे याने गोवर्धन पवार यांच्या डोक्यात कुकरीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच सुदाम पडुळे यांच्या डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी कु-हाडीच्या तुंब्याने आणि कोयत्याने फिर्यादीच्या इतर सहकाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. जखमींवर बीड येथील सरकारी रुग्णालयात दोन दिवस उपचार करण्यात आले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करत आहेत.


Categories

Recent Posts