Breaking
Updated: May 26, 2025
WhatsApp Group
Join Nowसर्व कार्यक्रम केले रद्द ; देशमुख यांच्या मुलांशी संपर्क साधून केले सांत्वन
बीड – भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार आर टी देशमुख यांचे आज दुपारी रस्ता अपघातात दुःखद निधन झाले. घटनेची माहिती मिळताच नांदेड दौर्यावर असलेल्या राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे हया आपले सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने लातूरकडे रवाना झाल्या.
लातूर जिल्हयातील बेलकुंड जवळ एका रस्ता अपघातात माजी आमदार आर टी देशमुख यांचं दुःखद निधन झालं. आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या निधनाची बातमी कळताच नांदेड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी नांदेड येथे असलेल्या ना. पंकजाताई मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले व त्या तातडीने लातूर कडे रवाना झाल्या.
आर टी देशमुख यांना लातूर येथील सहयाद्री हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हाॅस्पीटलचे डाॅ किणीकर यांच्याशी त्या बोलल्या. आर टी देशमुख यांचे चिरंजीव रोहित सध्या जपान मध्ये आहेत, त्यांच्याशी व राहूल यांच्याशी देखील ना. पंकजाताई मुंडे यांनी संपर्क साधून सांत्वन केले व धीर दिला.
आर टी जिजा यांच्या बातमीने मला धक्काच बसला. ही घटना माझ्यासाठी खूपच दुःखद आणि वेदनादायी आहे. जिजा आमचे ज्येष्ठ सहकारी होते. लोकनेते मुंडे साहेबांचे ते निष्ठावान सहकारी होते, त्यांच्या जाण्याने मला खूप वेदना होत आहेत अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.