परळी : परळी तालुक्यातील पांगरी परिसरात पुलाच्या कामावर असताना परळी शहरातील कामगार आमेर अजमेर पठाण याचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून प्रशासनाकडून मृत कामगाराच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्यात आली.
आज तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय मुंडे आणि परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते पठाण यांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
धनंजय मुंडे यांनी या घटनेनंतर तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्देश देऊन आर्थिक मदत तत्काळ देण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार प्रशासनाने वारसांना चार लाखांची मदत मंजूर केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी उपनगराध्यक्ष आयुब पठाण, अजीज कच्ची, रवी मुळे, अल्ताफ पठाण, नय्युम शहा, राजू भाई, बद्दल भाई, स्थानिक तलाठी विष्णू गीते, खाजाभाई, जफर भाई, बकश भाई, अन्सारी सर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.