Breaking
Updated: जानेवारी 31, 2026
पाटोद्यात भरदिवसा घरफोडी; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा: तालुक्यातील थेरला येथे एका शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. ही घटना ३० जानेवारी २०२६ रोजीच्या मध्यरात्री घडली. फिर्यादी सुखदेव दिनानाथ राख (वय ७०) हे घरी नसताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील लोखंडी पेटी आणि डब्यात ठेवलेले १५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, १२ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि १५ ग्रॅमची सोन्याची बोरमाळ असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरला. तसेच कपाटातील ३० हजार रुपयांची रोकडही चोरून नेली. पाटोदा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भावड तपास करीत आहे