Breaking

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन, स्वस्त धान्य आणि शिधापत्रिका प्रश्नी राजकिशोर मोदींचे तहसीलदारांना निवेदन

Updated: June 25, 2025

By Vivek Sindhu

सामान्य जनतेच्या प्रश्नांवर राजकिशोर मोदी यांचा प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

सामान्य जनतेच्या प्रश्नांवर राजकिशोर मोदी यांचा प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मागील अनेक महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. तसेच अनेक गोरगरीब कुटुंबांना अजूनही शिधापत्रिका मिळाल्या नसल्यामुळे ते स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी बुधवार, दिनांक २५ जून रोजी तहसीलदार विलास तरंगे यांची भेट घेऊन संबंधित मागण्यांचे निवेदन सादर केले.

या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, या योजना मुख्यत्वेकरून गरजू, वयोवृद्ध, अशक्त नागरिकांसाठी आहेत. मात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळत नसल्याने ते वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. ही परिस्थिती अन्यायकारक असून प्रशासनाने तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी मोदी यांनी केली.

तसेच अनेक कुटुंबांना शिधापत्रिका नसल्यामुळे रेशन दुकानांवरून धान्य मिळत नाही. उपजीविकेच्या दृष्टीने रेशन गरजेचे असतानाही ते वंचित राहतात, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना रखडलेले मानधन त्वरीत वितरित करावे आणि शिधापत्रिका वाटपाची कार्यवाही तातडीने करावी, अन्यथा जनहितार्थ आंदोलन छेडले जाईल असा इशारा राजकिशोर मोदी यांनी दिला.

तहसीलदार विलास तरंगे यांनी निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या सर्व मागण्यांचा लवकरच विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राजकिशोर मोदी यांना दिले.

या निवेदनावर अनेक कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शविला. त्यामध्ये महादेव आदमाने, डॉ. राजेश इंगोले, किशोर परदेशी, धम्मा सरवदे, खालेद चाऊस, रफिक गवळी, अशोक देवकर, बबन पाणकोळी, सुभाष पाणकोळी, अकबर पठाण, सुधाकर टेकाळे, सचिन जाधव, आकाश कराड, दत्ता सरवदे, चेतन मोदी, सय्यद ताहेर, खलील जाफरी, मुन्ना पठाण, शरद काळे, महेबूब गवळी, जावेद शेख, गोविंद पोतंगले, रोशन लाड, कमलाकर हेडे, फारूख शेख चाँद, वजीर शेख, सय्यद रशिद, संतोष चिमणे, सुदाम देवकर, संतोष माने, शुभम लखेरा, महेश कदम, रोहन कुरे, अमित परदेशी, अस्लम शेख, जमदार पठाण, विश्वजीत शिंदे, विशाल पोटभरे, महेश वेडे, मुन्ना वेडे, राम घोडके, निखिल वांजरखेडकर, सिद्धार्थ साबळे, कैलास कांबळे यांचा समावेश आहे