Breaking
Updated: June 12, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupअंबाजोगाई – अबुधाबी विद्यापीठ दुबई (कॅम्पस) येथे 23 मे 2025रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान संचलित, कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, आंबेजोगाई येथील डॉ. दिलीप सिताराम मस्के यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल बेस्ट अकॅडमिशन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.
ही आंतरराष्ट्रीय परिषद अबुधाबी युनिव्हर्सिटी दुबई युएई, निजवा विद्यापीठ ओमन आणि दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. सदर पुरस्कार अबुधाबी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हमद ओधाबी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी प्रो. मोन्टासिर क्यूशामेह (अबुधाबी) प्रो रियाज अहमद (ओमेन) डॉ. अरविंद चव्हाण महाराष्ट्र उपस्थित होते. डॉ. दिलीप मस्के यांची महाविद्यालयात 28 वर्ष सेवा झाली असून त्यांनी आतापर्यंत प्राध्यापक, संशोधक, केंद्रप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, म्हणून कार्य केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर समाजशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य म्हणून कार्य केले आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून जनजागृतीचे कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक कार्य करीत आहेत.
या कार्यव्यतिरिक्त त्यांनी अनेक पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्याकडे आजही महाराष्ट्र शासनाची बार्टी व सारथी ची फेलोशिप मिळालेले पीएच.डी.चे विद्यार्थी काम करत आहेत. या कार्याबद्दल छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे. व्यवस्थापकीय संचालक यांनी विशेष पत्र पाठवून पीएच.डी मार्गदर्शनाबाबत अभिनंदन केले आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी पदवी ,पदव्युत्तर विद्यावाचस्पती होऊन विविध ठिकाणी शासकीय निमशासकीय पदावर कार्यरत आहेत.
नेपाळ, थायलंड, दुबई येथे जाऊन कॉन्फरन्स मध्ये त्यांनी संशोधन लेख सादर केले आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास 85 संशोधन पेपर राज्य ,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले आहेत.
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून अबुधाबी विद्यापीठ, दुबई येथे त्यांचा गौरव करण्यात आला. त्याबद्दल वेनूताई चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्रजि लोमटे, उपाध्यक्ष सतीश नाना लोमटे, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्र, पत्रकार आदिने अभिनंदन केली आहे.