Breaking
Updated: June 20, 2025
WhatsApp Group
Join Nowकेज : गस्तीवर असलेल्या युसुफवडगाव पोलिसांनी रस्त्यात जखमी झालेल्या हरिणाचे प्राण वाचविले. युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद अमजद हे त्यांच्या हद्दीत गस्त घालीत असताना केंद्रेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला रस्ता ओलांडत असताना एका झाडाच्या खोडाला धडकून एक हरीण जखमी अवस्थेत पडलेले आढळले.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षा सय्यद अमजद यांनी तात्काळ हरिनाजवळ जाऊन अंबाजोगाई येथील वनविभागाचे अधिकाऱ्यांना कळविले. माहिती मिळताच वनसेवक विष्णू शेप, भगवान शेप हे घटनास्थळी हजर होऊन त्यांनी जखमी हरिणाला उपचारासाठी घेऊन गेले. दरम्यान, जखमी हरिणाचे प्राण वाचविणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद अमजद आणि वनरक्षक विष्णू शीप व भगवान शेप यांचे कौतुक होत आहे.