Breaking

माजी पोलीस निरिक्षक सुनील नागरगोजे यांची आत्महत्या

Updated: सप्टेंबर 1, 2025

By Vivek Sindhu

InShot 20250901 221623132

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : पोलिस दलातील माजी पोलीस निरिक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय ५७) यांनी अंबाजोगाई येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी (दि.०१) रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सुनील नागरगोजे हे मूळ परळी तालुक्यातील नागदरा येथील होत. अनेक वर्षांच्या सेवेनंतर मागील काही महिन्यांपूर्वी ते नोकरीतून बाहेर पडले होते. नुकतेच त्यांनी अंबाजोगाई येथील घर बांधकामासाठी पडल्याने ते प्रशांत नगर येथे किरायाने राहत होते. त्या ठिकाणीच त्यांनी सोमवारी रात्री घरात कोणी नसताना सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यान, सुनील नागरगोजे यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts