Breaking
Updated: जानेवारी 22, 2026
२०२५ मध्ये एमपीडीए कायद्यांतर्गत केली प्रभावी कामगिरी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel२०२५ मध्ये एमपीडीए कायद्यांतर्गत केली प्रभावी कामगिरी
अंबाजोगाईत: जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत प्रभावी कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बीड जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक आढावा बैठकीत शरद जोगदंड यांच्यासह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी बीड जिल्हा पोलीस दलाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी प्रलंबित गुन्हे, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवायांची माहिती घेतली. यावेळी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढवण्याचे आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले. विशेषतः एमपीडीए अंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याच्या मोहिमेत शरद जोगदंड यांनी बजावलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असून, त्यांच्या या कार्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
शरद जोगदंड यांच्यासह पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ आणि शितलकुमार बल्लाळ यांचाही एमपीडीए कारवाईसाठी सत्कार करण्यात आला. तसेच रात्रगस्ती दरम्यान चोख कर्तव्य बजावणारे बीड शहराचे पोलीस उपनिरीक्षक संदिप नेवरे, ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गुंड व त्यांच्या पथकातील अंमलदारांनाही सन्मानित करण्यात आले. गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर कारवाया सुरूच ठेवाव्यात, असे वीरेंद्र मिश्र यांनी स्पष्ट केले.
आढावा बैठकीत वीरेंद्र मिश्र यांनी अवैध गुटखा विक्री, बेकायदेशीर अग्निशस्त्रे आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले. शहरात सुरक्षिततेसाठी जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.