Breaking

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला; पोलीस कारवाई

Updated: एप्रिल 13, 2026

By Vivek Sindhu

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला; पोलीस कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव: माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने रिधोरी फाट्याजवळ सापळा रचून विनापरवाना बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडला आहे. १२ एप्रिल रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

पोलीस अंमलदार विठ्ठल श्रीराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेगाव ते करवण जाणारे रोडवर एक लाल रंगाचा भारत बेझ कंपनीचा हायवा (क्रमांक MH 23 AU 0449) वाळू भरून येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तो अडवून तपासणी केली असता, त्यात विनापरवाना वाळू आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक राजेंद्र नेमाणे (वय २३, रा. नारायणगाव, जि. जालना) याला ताब्यात घेतले आहे. वाळू उपसा करून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार डोगरे तपास करत आहेत.


Categories

Recent Posts