Breaking
Updated: June 29, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupबीड : शहरातील प्रसिद्ध उमाकिरण क्लासेसमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात तब्बल दोन दिवस फरार असलेले प्रोफेसर विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना अखेर अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. २८ जून) मध्यरात्री बीड तालुक्यातील मांजरसुंभा परिसरातून सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या.
गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांना सफारी गाडीतून हे दोघे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पथक रवाना करत, परिसरात सापळा रचून विजय पवार व प्रशांत खाटोकरला अटक केली. लवकरच दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.