केज : तालुक्यातील पिंपळगव्हाण येथून फुलकोबी भरून नागपूरला चाललेले पिकअप (एम. एच. ४४ यू. ४१५३) केज – मांजरसुंबा रस्त्यावर शारदा इंग्लिश स्कुलसमोर गतिरोधक चुकविताना चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाले. सुदैवाने चालकाला इजा झाली नाही. त्यानंतर पिकअपमधील कोबी दुसऱ्या पिकअपमध्ये भरून नेण्यात आला.