Breaking

पिकअप मालकास लाकडी दांड्याने मारहाण ; डोके फुटले, हात फॅक्चर

Updated: नोव्हेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

टिप्परच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – पिकअप चालकाने कट मारल्यावरून पिकअप मालकास लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत डोके फुटले असून हात ही फॅक्चर झाल्याची घटना केज बसस्थानकासमोर २५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील बसस्थानक पाठीमागील भागातील उमेर मुस्ताक फारोकी (वय ३०) या तरुणाचे पिकअप असून त्यास २५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या बसस्थानकासमोर अभी मेटे, डि. के. पाटील, गणेश लोंढे, तुषार सुरेश मेटे इतर दोन अनोळखी या सहा जणांनी तुझ्या पिकअप गाडीवरील चालकाने माझ्या गाडीला कट का मारला असे कारण काढून गैरकायद्याची मंडळी जमवून लाकडी दांडा डोक्यात मारून डोके फोडले. हातावर लाकडी दांडा मारून हात फॅक्चर केला. तर शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार उमेर फारोकी याने दिल्यावरून वरील चौघांसह अनोळखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार बालासाहेब रोडे हे करीत आहेत.


Categories

Recent Posts