Breaking

पेठ बीडमध्ये भरधाव छोटा हत्तीच्या धडकेत पादचारी ठार

Updated: ऑगस्ट 29, 2025

By Vivek Sindhu

दुचाकी विद्युत खांबाला धडकून तरुणाचा जागीच मृत्यु

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शहरातील पेठ बीड परिसरात भरधाव वेगाने आलेल्या छोटा हत्ती वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आमेर खान बाबु खान (रा. मोहमदिया कॉलनी, पेठ बीड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास सय्यद आलीनगर पाटीजवळ ही घटना घडली. त्या वेळी पायी चालत घराकडे जात असलेले बाबु खान उस्मान खान (वय ५५, रा. मोहमदिया कॉलनी, पेठ बीड) यांना छोटा हत्ती (क्र. MH-14 DM-5678) या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बाबु खान उस्मान खान गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाले. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला असून त्याचे नाव व गाव अद्याप कळू शकलेले नाही.
या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करत आहेत.


Categories

Recent Posts