Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

पेठ बीड पोलीस ठाण्याच्या कारवाईत तीन गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार

Updated: नोव्हेंबर 8, 2025

By Vivek Sindhu

पेठ बीड पोलीस ठाण्याच्या कारवाईत तीन गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. निखील किरण धारु (रा. वतारवेस पेठ बीड), शेख अख्तर शेख रशीद (रा. अचानक नगर पेठ बीड) आणि बालाजी सुनिल गुणवंत (रा. भोई गल्ली पेठ बीड) अशी त्यांची नावे आहेत.

सदर तिघांवर पेठ बीड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश मा. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस ठाणे पेठ बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1)(अ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथे सादर केला होता.

प्रस्तावाचे परीक्षण करून उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी निखील किरण धारु आणि बालाजी सुनिल गुणवंत यांना सहा महिन्यांसाठी, तर शेख अख्तर शेख रशीद यांना एक वर्षासाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार पोलिसांनी तिघांची हद्दपारीची कार्यवाही पूर्ण केली असून आरोपींना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे.

सदर आरोपी जिल्ह्याच्या हद्दीत आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलीसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढेही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अशाच प्रकारे कठोर हद्दपारीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पुजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रितमकुमार पुजारी, पोलीस हवालदार सुभाष मोठे, नितीन राठोड, अजित शिकेतोड, तुकाराम चांदणे व अंमलदार औदुंबर गिरी यांनी केली.


Categories

Recent Posts