Breaking
Updated: July 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupदररोज ढगाळ वातावरण, पण पाऊस पडेना
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई शहरासह जिल्ह्यात सध्या आकाशात दररोज ढग दाटलेले दिसत असले तरी अपेक्षित पाऊस काही केल्या पडत नाही. परिणामी, शेतकर्यांमध्ये चिंता वाढली आहे.
काही ठिकाणी हलकासा शिडकाव झाल्याने शेतकर्यांनी पेरण्या केल्या मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने उगवलेल्या पिकांवर मरगळ येण्याची भीती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काही दिवसांत पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे काही भागांत पिकांची वाढ थांबण्याची गंभीर भीती निर्माण झाली आहे. विशेषतः ज्या शेतकर्यांनी सुरुवातीच्या हलक्या पावसावर विश्वास ठेवून सोयाबीन, तूर, मका यांसारख्या पिकांची पेरणी केली होती, त्यांना आता पिकांचे उगम होऊनही पुरेसा पाणीपुरवठा न मिळाल्यामुळे मरगळ येण्याचा धोका वाटतो आहे. तसेच ढगाळ व दमट वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे.
पाऊस पडत नसल्यामुळे मोंढ्यात शुकशुकाट
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे मोंढ्याच्या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या या परिसरात काही भागात पेरण्या झाल्या तर काही परिसरात पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत, परिणामी, मोंढ्यात नेहमीची गजबज गायब झालेली दिसून येत आहे.