Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी

Updated: डिसेंबर 27, 2025

By Vivek Sindhu

स्कॉर्पिओच्या धडकेत ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज शहरातील फुले नगर भागातील नयुम सुलेमान शेख (वय ४०) व त्यांचा मित्र सोहील अहेमद फारूकी हे दोघे २६ डिसेंबर रोजी रात्री ७.४५ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्कुटीवर (एम. एच. ४४ एएफ १४७३) बसून अंबाजोगाई रोडवरील मित्राला भेटण्यास निघाले होते. थोरात हॉस्पिटलच्या पुढे १०० फूट अंतरावर गेले असता अंबाजोगाई रोडने भरधाव वेगात निलेल्या अज्ञात दुचाकीने त्यांच्या स्कुटीला अचानक पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात नयुम शेख व सोहील फारूकी हे दोघे रस्त्यावर पडून त्यांच्या हाताला, पायाला मार लागून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्कुटीचे नुकसान झाले असून दुचाकी चालक न थांबता दुचाकी घेऊन पसार झाला. नयुम शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक त्रिंबक सोपणे करताहेत.


Categories

Recent Posts