Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत बीड पोलीसांचा चमकदार विजय; ५८ पदकांची लयलूट

Updated: नोव्हेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत बीड पोलीसांचा चमकदार विजय; ५८ पदकांची लयलूट

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : छत्रपती संभाजीनगर येथे ११ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्हा पोलीस दलाने ऐतिहासिक कामगिरी करत ५८ पदकांची कमाई केली. पुरुष आणि महिला गटात उत्कृष्ट प्रदर्शन करीत बीड पोलिसांनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. यंदा पुरुष गटाबरोबरच महिला गटातही बीडने प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेदरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंना थेट प्रोत्साहन दिले. त्यांच्या भेटीमुळे दोन्ही संघांचे मनोबल अधिक उंचावले.

पुरुष गटात थ्रिलिंग प्रदर्शन करत ३६ प्रकारांत पदकवृष्टी झाली. त्यात थाळीफेक, गोळाफेक, धावणे, कुस्ती, जूडो, तायक्वांदो, पॉवरलिफ्टिंग, जलतरण, फुटबॉल, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, हँडबॉल, खो-खो, बास्केटबॉल आदी स्पर्धांमध्ये बीडच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. महत्त्वाचे म्हणजे, विविध संघीय खेळांतही बीडची समन्वयक कामगिरी ठळकपणे दिसून आली.

महिला गटातही पहिल्यांदाच पाठवलेल्या कबड्डी संघाने कडवी झुंज देत उल्लेखनीय यश मिळवले. महिला गटात पॉवरलिफ्टिंग, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, जूडो आणि खो-खोमध्ये दमदार कामगिरी करत अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळवण्यात आली.

स्पर्धेतील सर्वोत्तम महिला ऍथलिट हा सन्मान बीड जिल्हा पोलीस दलाच्या शीतल नाहोरकर यांनी पटकावला. त्यांना ॲक्टिवा दुचाकी हा विशेष पारितोषिक म्हणून देण्यात आला.

या सर्व यशाबद्दल पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विजेते तसेच सहभागी खेळाडूंना अभिनंदन करून भविष्यात अधिक उंच यश मिळवण्याच्या शुभेच्छा दिल्या. या मोहिमेचे मार्गदर्शन अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले. संघ व्यवस्थापनाची जबाबदारी राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग दलाई, उपनिरीक्षक बाबर आणि पोअं/अविनाश पांचाळ यांनी पार पाडली.

स्पर्धेतील बीड पोलिसांची प्रदर्शित एकजूट, शिस्त आणि क्रीडा कौशल्यामुळे जिल्ह्याचा लौकिक लक्षणीयरीत्या उंचावला आहे.


Categories

Recent Posts