Breaking

परळीतील बिबदरा पाझर तलाव फुटला

Updated: ऑगस्ट 28, 2025

By Vivek Sindhu

परळीतील बिबदरा पाझर तलाव फुटला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी – सततच्या पावसामुळे बोरणा नदीवरील भोजनकवाडी नागदरा येथील बिबदरा पाझर तलाव गुरुवार (दि.२८) रोजी सकाळी फुटला आहे. तलावाखालील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

३५ वर्षापूर्वी माजी ग्रामविकास राज्य मंत्री पंडितराव दौंड यांच्या मंत्रीपदाच्या काळात बिबदरा पाझर तलाव बांधण्यात आला होता. या तलावाच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांनी अनेकदा मागणी केली होती. परंतु, पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने पाझर तलाव फुटून शेतजमीनी वाहून जाऊन अतोनात नुकसान झाल्याचा आरोप माजी आमदार संजय दौंड यांनी केला आहे. परळी तालुक्यातील नंदनज येथील बोरणा मध्यम प्रकल्प २४ ऑगस्ट रोजी ओव्हरफ्लो झाला असून, प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. या जलसाठ्यामुळे बोरणा मध्यम प्रकल्पाखालील नंदनज, कासारवाडी, सारडगाव ,मिरवट, मांडवा व इतर गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच सारडगाव व नंदनज परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नंदनज येथील बोरणा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे बोरना नदीवरील भोजनकवाडी नागदरा येथील बिबदरा पाझर तलाव गुरुवारी सकाळी फुटला आहे. त्यामुळे तलावाखालील शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे.


Categories

Recent Posts