Breaking

परळीत घरात घुसून वस्तऱ्याने जीवघेणा हल्ला; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 1, 2026

By Vivek Sindhu

चौघांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: परळी येथील कंडक्टर कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून घरात घुसून एका तरुणावर वस्तऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

उद्धव विनायकराव हाडबे राहणार हाडबेवाडी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या घरात झोपलेले असताना आरोपी सुनील राऊत याने बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला आणि आपल्या हातातील वस्तऱ्याने उद्धव यांच्या कानावर आणि गालावर वार करून गंभीर दुखापत केली. यावेळी आरोपीची पत्नी रूपाली सुनील राऊत हिने देखील फिर्यादीच्या घरात घुसून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संभाजीनगर परळी वै पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि सहायक फौजदार ननवरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts