Breaking
Updated: डिसेंबर 15, 2025
प्रभाग क्रमांक १ मध्ये घराघरात पोहोचली शेख रिजवाना अहेमद (हाजी लाला) यांची 'कपबशी'
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – लोक विकास महाआघाडीचे अंबाजोगाई नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि महाआघाडीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी शहरातील प्रभाग क्रमांक – १ ब मध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला. ठिकठिकाणी मोदी व माजी आ.साठे यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. मोदींच्या झंझावाती प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक – १ ब च्या लोक विकास महाआघाडीच्या सर्वसाधारण महिला उमेदवार शेख रिजवाना अहेमद (हाजी लाला) यांची बाजू अधिक बळकट झाली आहे. मोदी यांनी सदरील प्रभागातील मतदारांना त्यांनी मतदानरूपी आशीर्वाद देवून उमेदवार शेख रिजवाना अहेमद (हाजी लाला) यांना शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान केंद्रावर जाऊन लोक विकास महाआघाडीच्या सर्वसाधारण महिला उमेदवार शेख रिजवाना अहेमद (हाजी लाला) यांच्या ‘कपबशी’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
सुरूवातीपासूनच मोदी यांनी प्रभाग क्रमांक – १ ब मधील मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी व आशीर्वाद घेतले आहेत. त्यावेळी आणि आता ही जागोजागी पापा मोदींच्या ‘कपबशी’ला प्रभाग क्रमांक एक मध्ये ही जनतेतून मोठी पसंती, आशीर्वाद, समर्थन, पाठिंबा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक – १ ब मधील सर्व मतदारांना सहकार्य करण्याची व मतदानरूपी आशिर्वाद देण्याची साद राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे व त्यांच्या लोकविकास महाआघाडीचे प्रभाग क्रमांक – १ ब चे सर्वसाधारण महिला उमेदवार शेख रिजवाना अहेमद (हाजी लाला) यांच्या प्रचारार्थ प्रभागात प्रचार फेरी काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत हाजी महेमूद दादामियाॅं, अमित जाजू, रूपेश चव्हाण, सोमनाथ धोत्रे, सुधाकर टेकाळे, अशोक देवकर, सुदाम देवकर, राजूभाई अन्सारी, ऍड.मोहसिन मिर्झा, सुभाष पानकोळी, बबन पानकोळी, जावेद शेख, लहू शिनगारे, सर्जेराव पवार, किशोर गोरे, शाहिद शेख, जमदार पठाण, जहागीरदार, खाजा शेख, खलील जाफरी, रशीद सय्यद, वजीर शेख, शाकेर काजी, निसार बेग, संजय कोंबडे, चंद्रकांत महामुनी इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते. याप्रसंगी नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांच्या समवेत प्रभाग क्रमांक – १ ब मधील लोकविकास महाआघाडीचे नगरसेवकपदाच्या सर्वसाधारण महिला उमेदवार शेख रिजवाना अहेमद (हाजी लाला) यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते, प्रभागातील अनेक युवा सहकारी सोबत होते. प्रभागातील या भेटी दरम्यान राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मतदारांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केल्या जात होते. यावरून राजकिशोर मोदी यांच्या प्रति सर्वधर्मीय मतदारांचा विश्वास, आपुलकी व प्रेम दिसून येत होते. अंबाजोगाई शहराचा मोदींवर मोठा विश्वास आहे. जनतेचे सहकार्य व आशीर्वादामुळे राजकिशोर मोदी हे सातत्याने अंबाजोगाई नगरपरिषदेच्या माध्यमातून शहर वासियांची सेवा करीत आहेत. मोदी हे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत आपला सक्रिय सहभाग घेऊन त्यातून त्यांनी युवकांची एक नवीन फळी तयार केली आहे. अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान राजकिशोर मोदी हे त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांच्या बळावरच यापुढेही मतदानरूपी आशिर्वाद मागत आहेत. अंबाजोगाई शहर हे एक कुटुंब म्हणून आपण काम केले असून येथील नागरिकांनी देखील भक्कम अशी साथ दिली आहे. यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजकिशोर मोदी व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना पाठबळ देण्याचे आवाहन या प्रचारादरम्यान ते मतदारांना करीत आहेत. मतदार देखील खंबीरपणे मोदींच्या पाठीशी उभे राहण्याचे अभिवचन देतांना दिसून येत आहेत. शहरातील आठरापगड जाती धर्मातील मतदार, बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार समाज बांधव, नवयुवक, महिला व जेष्ठ नागरिक यांच्याकडून मिळत असलेले प्रेम, आशीर्वाद पाहून मोदी व त्यांचे सहकारी भारावून जात आहेत. अंबाजोगाईतील उर्वरित चार ही प्रभागात पापा मोदींच्या ‘कपबशी’ कडे जनतेचा ओढा दिसून येत आहे. तसेच प्रभाग क्रमांक – १ ब मधील लोक विकास महाआघाडीच्या सर्वसाधारण महिला उमेदवार शेख रिजवाना अहेमद (हाजी लाला) यांना मतदारांचा आशिर्वाद, पाठबळ आणि मोठे समर्थन मिळत आहे.