Breaking
Updated: नोव्हेंबर 18, 2025
पन्नगेश्र्वर शुगर मिल्स लिमिटेडचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : पन्नगेश्र्वर शुगर मिल्स लिमिटेड, विमल नगर, पानगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथे सन 2025-26 गळीत हंगामातील पहिला बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 रोजी चेअरमन अक्षय मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. हंगामाचा शुभारंभ औपचारिकरित्या करण्यात आला असून उत्पादन प्रक्रियेची तयारी पूर्ण झाल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले.
समारंभात राजू भन्साळी, शरद इंगळे, रोहन मुंदडा, रवी भन्साळी, जनरल मॅनेजर व्यंकट वाकडे, चीफ इंजिनीअर, मोरे, काटे, ऍग्री ऑफिसर करपे, चीफ केमिस्ट हेडे, चीफ अकाउंटंट खोसे, ऊस पुरवठा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, सिव्हिल इंजिनीअर, एचआर विभाग, सिक्युरिटी ऑफिसर तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
हंगामाच्या सुरुवातीचा पहिला टप्पा असलेला अग्निप्रदीपन समारंभ सुरळीतपणे पार पडल्याने गळीत हंगामाची सुरुवात यशस्वी होण्याबद्दल कारखाना परिसरात समाधान व्यक्त होत आहे. ऊस पुरवठा साखळी, प्रक्रिया यंत्रणा आणि उत्पादन व्यवस्थापनाची पूर्वतयारी पूर्ण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सहभाग आणि कारखाना कर्मचाऱ्यांचे योगदान अधोरेखित करत यावर्षीचा हंगाम अधिक उत्पादनक्षम व सुरळीत राहील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.