Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

कांद्याच्या पिकात लपवलेली ५ लाखांची अफू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Updated: फेब्रुवारी 21, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 02 21 at 8.47.07 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: बीड स्थानिक गुन्हे शाखेने आष्टी तालुक्यातील पिंपळा परिसरात धाड टाकून कांद्याच्या शेतात केली जाणारी अफूची बेकायदेशीर शेती उघडकीस आणली आहे. शेतकरी परसराम मोहन जगधने याने आपल्या ताब्यातील शेतात कांद्याच्या पिकामध्ये लपवून अफूची बेकायदेशीर लागवड केली होती. गोपनीय माहितीच्या आधारे २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस पथकाने छापा टाकला असता शेतात अफूची झाडे बोंडे आणि फुलांसह संवर्धन केलेली आढळून आली. पोलिसांनी या ठिकाणाहून २० किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून बाजारभावानुसार त्यांची किंमत ५ लाख रुपये आहे. आरोपी परसराम जगधने याने विनापरवाना अंमली पदार्थांचे उत्पादन केल्यामुळे त्याच्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय अधिकारी हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, अशोक दुबाले, गोविंद राख आणि अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भडके व तावरे या पथकाने ही कामगिरी केली आहे. सध्या अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts