Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

जवळगाव बस स्थानकावर रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू; वृद्ध प्रवासी गंभीर जखमी

Updated: जानेवारी 29, 2026

By Vivek Sindhu

जवळगाव बस स्थानकावर रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू; वृद्ध प्रवासी गंभीर जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

​अंबाजोगाई: तालुक्यातील जवळगाव बस स्थानक परिसरात बुधवारी सायंकाळी एक भीषण रिक्षेचा अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या ऑटो रिक्षाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनेराव बापुराव कोकणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, रिक्षातील ८० वर्षीय प्रवासी बाबुराव पांचाळ हे गंभीर जखमी झाले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास सोनेराव कोकणे हे जवळगाव बस स्थानकावर उभे होते. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या (एमएच ४४ यू ०७८४) क्रमांकाच्या ऑटोने त्यांना भीषण धडक दिली. या धडकेत कोकणे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी जवळगाव येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

​या अपघातात रिक्षात प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक बाबुराव पांचाळ हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सोनेराव कोकणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव आधार हरवल्याने कोकणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जवळगाव परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts