Breaking

प्रभाग क्रमांक ९ मध्ये लोकविकास महाआघाडीच्या प्रचाराचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ

Updated: नोव्हेंबर 19, 2025

By Vivek Sindhu

*प्रभाग क्रमांक ९ मध्ये लोकविकास महाआघाडीच्या प्रचाराचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ*

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी तसेच प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार दिनेश भराडीया आणि दिपाताई बबनराव लोमटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ हौसिंग सोसायटी येथील दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. प्रचाराच्या प्रारंभी दत्तमूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी अंबा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दत्ता पाटील, दाजीसाहेब लोमटे, चंद्रशेखर वाडमारे, मदनलाल परदेशी, ऍड. चिखलीकर, ऍड. चौधरी, प्रकाश सोळंकी, विशाल जाजू, चिमु पाटील, जमील भाई, पिंटू दामा, डॉ. ढेले, कल्याण भिसे, सिद्धेश्वर स्वामी, राजू ओपळे, मंत्री, गुंजाळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बबनराव लोमटे यांनी मनोगत व्यक्त करतांना आपण अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या सुख–दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. लहान–मोठा किंवा गरीब–श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता काम केले असून प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न केल्यामुळे नागरिकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत लोकविकास महाआघाडीची निर्मिती राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, आरपीआयचे महेंद्र निकाळजे आणि दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचे सांगितले. या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी तसेच प्रभागातील उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अंबा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दत्ता पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत लोकविकास महाआघाडीला आपला आशिर्वाद दिला. राजकिशोर मोदी, दिनेश भराडीया आणि दिपाताई लोमटे हे तिन्ही उमेदवार प्रामाणिक, विश्वासू आणि मतदारांच्या कसोटीवर खरे उतरणारे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागातील लहान–मोठे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी हे तिन्ही उमेदवार सदैव पुढाकार घेतात, यामुळे येणाऱ्या २ डिसेंबर रोजी त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात चंद्रशेखर वाडमारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. तर मदनलाल परदेशी यांनी प्रभागातील नागरिकांचे शिष्टमंडळ घेऊन जाऊन बबनराव लोमटे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी बबनराव लोमटे हे चालते–फिरते न्यायालय असल्याचे सांगत शहरात निर्माण झालेल्या आकाच्या हुकूमशाहीला रोखण्यासाठी लोकविकास महाआघाडीला विजयी करणे अत्यावश्यक असल्याचे ठासून सांगितले.

प्रचाराच्या शुभारंभानंतर सर्व उमेदवारांनी प्रभागातील विविध भागांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि लोकविकास महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले. या भेटीदरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


Categories

Recent Posts