Breaking
Updated: ऑगस्ट 30, 2025
नेकनूरात दोन बिअर बार फोडून ५२ हजारांचा मुद्देमाल लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनेकनूर : तालुक्यातील चौसाळा-बीड रोडवरील दोन बिअर बार फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५२,९४० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रमेश अकुंश कळसे (रा. चौसाळा, ता. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आयन नावाचा बार स्वतः चालवतात. २६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता मॅनेजर अजय मोरे यांनी बार बंद केला होता. दुसऱ्या दिवशी गणपती स्थापनेसाठी बार बंद होता.
२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ते बोर चालू करण्यासाठी बारवर गेले असता, मागील बाजूचा खडक गज तुटलेला आणि शटर उघडे असल्याचे दिसले. आत पाहणी केली असता काउंटरमधील रोकड आणि इतर साहित्य चोरीस गेले होते. त्यात रोख रक्कम, विदेशी दारूच्या बाटल्या, सीसीटीव्ही डीव्हीआर व दोन कॅमेरे असा एकूण ४६,८४० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. तसेच शेजारील गणेश हजारे यांच्या बगीचा बिअर बारचे शटर फोडून रोख रक्कम, सीसीटीव्ही हार्डडिस्क असा एकूण ६,१०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. दोन्ही बारमधून मिळून **५२,९४० रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.