Breaking
Updated: डिसेंबर 15, 2025
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर होणार थेट कारवाई; पोलिसांचा इशारा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात कंबर कसली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक आणि वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याने जारी केलेल्या पत्रकानुसार, नायलॉन मांजा मानवी जीव आणि पक्षांसाठी घातक आहे. त्यामुळे जो कोणी या मांजाची विक्री किंवा साठवणूक करताना आढळेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी देखील अशा प्रकारची माहिती पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहितीसाठी ९२२५०९२८२३ हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.