Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

नांदूरघाट येथे मटका घेणाऱ्यास पकडले

Updated: डिसेंबर 5, 2025

By Vivek Sindhu

संमतीशिवाय शेतातून नेली पाईपलाईन; जेसीबीमुळे पिकाचे दीड लाखांचे नुकसान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे, पोलीस नाईक शमीम पाशा शेख यांच्या पथकाने ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नांदूरघाट (ता. केज) येथील बाजार तळावर छापा मारला. यावेळी अशोक संदीपान ढाकणे (रा. ढाकणवाडी ता. केज) यास कल्याण नावाचा मटका घेत असताना रंगेहाथ पकडले. तर मटका खेळण्यास आलेले लोक पोलिसांना पाहून पळून गेले. अशोक ढाकणे याच्याकडील मटका जुगाराचे साहित्य व नगदी २ हजार रुपये जप्त केले. तर ढाकणे याने सदरचा धंदा अनिल ढोबळे (रा. विडा) यास देत असल्याचे सांगितले. पोलीस नाईक शमीम पाशा शेख यांच्या तक्रारीवरून अशोक ढाकणे, अनिल ढोबळे या दोघाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार राजू वंजारे हे तपास करताहेत.


Categories

Recent Posts