Breaking
Updated: June 10, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज तालुक्यातील एकुरका येथील घटना
केज :- केज तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत पोहायला गेलेली ९ वर्ष वयाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. या बाबतची माहिती अशी की, दि.९ जून रोजी दुपारी भरत साधु मोरे यांची मुलगी कु. अंजली भरत मोरे ही ९ वर्षाची मुलगी जवळच असलेल्या विहिरीत पोहायला गेली असता पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विहिरी काठोकाठ भरलेली असताना प्रेत वर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या विहिरीवर पाण्याच्या मोटारी लावून पाणी कमी झाल्या नंतर रात्री ९:०० वा. च्या सुमारास प्रेत पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव यांनी विहिरीत बुडून मृत्य झालेल्या कु. अंजली मोरे हिचे प्रेत केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीत तपासणी व शव विच्छेदनासाठी आणले आहे.