Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

मोटार सायकल चोर मुद्देमालासह ताब्यात

Updated: जानेवारी 30, 2026

By Vivek Sindhu

*मोटार सायकल चोर मुद्देमालासह ताब्यात !*

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गौतम बचुटे/केज :- मारहाण करून मोटार सायकल हिसकावून घेत पळून गेलेल्या मोटार सायकल चोराचा केज पोलिसांनी तपास लावून अवघ्या २४ तासाच्या आत मोटार सायकल चोराच्या मुद्देमाला सह ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. २७ जानेवारी रोजी गणेश रमेश लोंढे आणि त्याचा मित्र रितेश शिवाजी घुले हे रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास केज येथील बस स्टँड जवळ त्यांचा मित्र शुभम भोसले याच्या टपरी जवळ त्याच्याशी बोलत थांबले होते. त्याच वेळी जुबेर उर्फ मारी मुस्ताक फारोकी हा आला व तो गणेश लोंढे याला.म्हणाला की, तू आणि तुषार मेटे यांनी पोलीस स्टेशन केज येथे त्याच्या विरुद्ध तक्रार का दिली होती ? असे म्हणुन त्याने गणेश लोंढे याला मारहान केली. त्याच वेळी जुबेरचा भाऊ उमेर उर्फ पापा मुस्ताक फारोखी हा पण तेथे आला. त्या दोघांनी गणेश लोंढे याला लाथाबुक्यानी बुक्यानी मारहाण करून गणेश आणि रितेश या दोघांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देवुन त्यांच्या ताब्यातील होंडा शाइन  कंपनीचं मोटार सायकल क्र. (एम एच ४४/एक्स २३७१) जबरदस्तीने हिसकावून हिसकावुन घेवुन त्याच गाडीवर निघुन गेले. 

*अवघ्या २४ तासाच्या आत पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे यांनी आवळल्या मोटार सायकल चोराच्या मुसक्या :-* गणेश लोंढे यांच्या तक्रारी वरून जुबेर उर्फ मारी मुस्ताक फारोकी आणि त्याचा भाऊ उमेर उर्फ पापा मुस्ताक फारोकी याच्यावर गु. र. नं. ४१/२०२६ भा

 न्या. सं. ११५(२), ३५१(३), ३५२, ३०८(६) मोटार सायकल चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम, पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलिस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार,

पोलिस कॉस्टेबल किशोर गोरे, पोलिस कॉन्स्टेबल मेहेत्रे यांनी यांनी तपासाची चक्रे फिरवून चोरट्याला जुबेर उर्फ मारी फारोकी याला ताब्यात घेतले. त्याला कायद्याच्या बडगा दाखविताच त्याने चोरून नेलेली मोटार सायकल ही त्याने फलोत्पादन विभागाच्या जागेत गवतात लपवून ठेवली होती. ती मोटार सायकल ताब्यात घेतली.

पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलिस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि पोलिस कॉस्टेबल किशोर गोरे, पोलिस कॉन्स्टेबल मेहेत्रे यांनी रात्रभर जागून मोटार सायकल चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतल्या बद्दल त्याचे कौतुक होत आहे.


Categories

Recent Posts