Breaking

ट्युशनला जात असलेल्या अल्पवयीन मुलीला कार मधून नेऊन डोंगरात निर्जनस्थळी बलात्कार

Updated: जानेवारी 7, 2026

By Vivek Sindhu

ट्युशनला जात असलेल्या अल्पवयीन मुलीला कार मधून नेऊन डोंगरात निर्जनस्थळी बलात्कार !

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गौतम बचुटे/केज :- ट्युशनला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला कार मधून घेऊन जात डोंगरात तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.

केज तालुक्यातील एका गावात राहत असलेली साडे पंधरा वर्ष वयाची एक अल्पवयीन मुलीची धीरज सांजुरे याच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा धीरज सांजुरे याने घेण्याच्या उद्देशाने दि. ६ जानेवारी रोजी धीरज सांजुरे याने त्या अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे आमिष दाखविले. 

त्या नंतर दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ती अल्पवयीन मुलगी केज येथे ट्युशनला जाण्यासाठी केज येथे आली असता सकाळी ९:३० च्या सुमारास धीरज सांजुरे त्या अल्पवयीन मुलीला एका कार मधून घेऊन गेला. केज येथून त्याने तिला धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात घेऊन गेला. तिथे गेल्या नंतर एका निर्जनस्थळी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. 

त्या नंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीने ही माहिती तिच्या पालकांना दिल्या नंतर पालकांनी पीडित मुलीसह केज पोलिस ठाणे गाठून या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. 

दरम्यान या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Categories

Recent Posts